गडकिल्ले भाड्याने दिल्यास माझ्याशी गाठ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे

डोंबिवली दि.०९ :- महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. गडकिल्ले भाड्याने देण्यापेक्षा मंत्र्यांनी त्यांचे बंगले भाड्यानी द्यावेत. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दिला. जर सरकारला उत्पन्न हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. भाजप ईव्हीएमच्या मदतीने निवडून येत असल्याने निर्णय घेताना लोकांना विश्वासात घेत नाही. ईडीच्या चौकशीबाबत ठाकरे म्हणाले की, मी एकमेव असा व्यक्ती आहे की थेट ईडीला सामोरा गेलो.

हेही वाचा :- डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट

२१ तारखेला आमचे आंदोलन होते आणि २२ तारखेला ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस येते हे काही न समजण्यासारखे आहे का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. मतपेटीद्वारे निवडणुका घ्याव्यात ईव्हीएमद्वारे नको या मागणीवर पक्ष ठाम आहे, असेही ते म्हणाले. चांद्रयान मोहीमेबद्दल ते म्हणाले की, या मोहिमेवर ८०० कोटींचा खर्च झाला असे सरकार सांगते. चंद्रावर सर्वप्रथम कोणी पाऊल ठेवले, असे विचारताच आपण निल आर्मस्ट्राँग सांगतो. त्यानंतर जगातील कोणीच का गेले नाही याचा विचार आपण का करीत नाही? असा सवाल त्यांनी केला.

प्रधानमंत्री मोदी की मुंबई को ३ नए मेट्रो रुटो की सौगात 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email