आगामी निवडणुकांत हरलो तर देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे
मुंबई दि.२४ :- येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. आगामी निवडणुकांत हरलो तर देशातून लोकशाही गायब होईल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत दिल्ली सरकारला अधिकार देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. लोकशाहीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. मात्र, केंद्र सरकारने त्याविरोधात अध्यादेश काढला. ही कोणती लोकशाही आहे? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी
दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारांसाठी मोठी लढाई लढली. मोदी सरकारने अध्यादेश काढून आमची ताकद हिरावून घेतली. आठ वर्षांच्या लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजून निकाल दिला. पण आठ दिवसांच्या आत मोदी सरकारने अध्यादेश काढून आमचे अधिकार काढून घेतले. अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणून देश चालवू शकत नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.
रेल्वे तिकीटांचे आरक्षण करून चढ्या दराने विक्री करण्याच्या षडयंत्राची चौकशी करा- अजित पवार
केंद्र सरकारने दिल्ली सरकारविरोधात काढलेला अध्यादेश चुकीचा, लोकशाहीविरोधी आणि लोकांनी निवडलेल्या सरकारचे अधिकार कमी करणारा आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत आहे. तेथे तो मंजूर होईल. मात्र राज्यसभेत विरोधकांचे बहुमत आहे. त्यामुळे आम्ही राज्यसभेत हा अध्यादेश मागे घ्यायला लावू काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याआधी ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला आल्या होत्या.