मराठा आरक्षणाबाबत कुणी राजकारण केल्यास वाईट परिणाम होतील, मराठा आंदोलकांचा इशारा

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कुणी राजकारण करताना आढळल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्यावतीने आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण मिळावे, अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे.

हेही वाचा :- २६/११ च्या हल्ल्यातील जवानांना डोंबिवलीत ईगल ब्रिगेड फाउंडेशनची श्रद्धांजली

आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मराठा आंदोलक म्हणाले की, “मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण मिळावे, अशी मराठा समाजाची मागणी आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र असा प्रकार करताना कुणी आढळल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. तसेच आझाद मैदानावर जमलेले आंदोलक पुढचे काही दिवस येथेच थांबतील, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.

Hits: 421

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email