विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले नाही तर राज्यभर आंदोलन – नाना पटोले
मुंबई दि.०४ :- राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात विशेष अधिवेशन बोलाविले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. काँग्रेस शिष्टमंळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आली.
अंमलीपदार्थ विरोधी कक्षाच्या कारवाईत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, ही मदत तात्काळ मिळावी, बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक लोकांवर पोलीस अत्याचार करत आहेत. खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचे बळी गेले, त्याप्रकरणात अद्याप कारवाई केली जात नाही या व राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे म्हणून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलेली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश नहार यांची निवड
वज्रमूठ सभांचे फेरनियोजन राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूछ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर व मुंबई अशा तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर व अमरावती येथे पुढील सभा होणार आहेत. परंतु मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे, वज्रमुठ सभा रद्द केलेल्या नाहीत, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.