* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> आमच्या आरत्याचा जर त्रास होत नसेल तर तुमच्या मशिदींवरच्या भोग्यांचा आम्हाला त्रास का…? – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

आमच्या आरत्याचा जर त्रास होत नसेल तर तुमच्या मशिदींवरच्या भोग्यांचा आम्हाला त्रास का…?

राज ठाकरे यांचं भाषणातील  प्रमुख मध्ये 

राज ठाकरे यांचं भाषण सुरु, बोलण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष.

“जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवांनो भगिनींनो” बोलून राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात

सोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन 

फेसबुक ट्विटरवर पक्षाबद्दलचे आक्षेप लिहू नका; तसं केल्यास कारवाई होईल

उत्तम काम करा आणि ते सोशल मीडियावर टाका

यशात सगळे सोबत असतात, पराभवात मात्र सगळे सल्ले देतात 

9 मार्चला वर्धापन दिन आहे. त्यानंतर 23 मार्चला गुढीपाडवा निमित्ताने शिवतीर्थावर जाहीर सभा 

ज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल, त्यांनी राजगड येथे पक्षाच्या कार्यालयात नोंद करावी. मला निवडणूक लढवायची नाही. मला संघटनेसाठी काम करायचे आहे. जे नोंद करणार नाही त्याचेही नाव माझ्यासमोर येईल

शॅडो कॅबिनेट आपलं सरकार आल्यावरही राहणार

2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता तेव्हा हिरवा असला पाहिजे हे असलं पाहिजे. माझ्या मागे कोण नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं

पूर्वीपासून भगवा झेंडा माझ्या मनात होता 

माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता, त्यामुळे शिवजयंती, गुढीपाडवा दरम्यान आम्ही झेंडा काढतो, बदललेल्या परिस्थितीमुळे हा झेंडा काढला हा निव्वळ योगायोग, माझा मूळ डीएनए हाच आहे

स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं

ही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये, निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही

मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही

सकारात्मक गोष्टीसाठी बदल हा आवश्यक असतो

मराठीला कुणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी त्याच्या अंगावर जाईन

देशाशी प्रामाणिक आहेत जे मुसलमान आमचेच आहेत

जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही

हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे

रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होती

मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही

समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल

मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो

राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही

बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून लावा, यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा

इतर देशांप्रमाणे भारतालाही कडक होण्याचेही गरजेचे आहे. आपण अनेक बॉम्बवर बसलो आहे, कधी काय होईल याची कल्पना नाही

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना 48 तासासाठी मोकळा हात द्या, बघा काय करतील. राज ठाकरेचा रंग तोच आहे तो बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारवर जात नसतो

देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा

बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानेच उत्तर देणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या भूमिकेतील बदल दाखवून दिल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदाच पक्षाचं अधिवेशन घेण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात मनसेच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवणही राज यांनी आपल्या भाषणात करून दिली. तसेच, झेंडा आवडला का? असा प्रश्नही राज यांनी कार्यकर्त्यांना विचारला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करुनच आपला अजेंडा स्पष्ट केला.जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो असे म्हणत राज यांच्या भाषणाची सुरुवात होत होती. मात्र, पक्षाचं नवनिर्माण करताना राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा अन् अजेंडाही बदलल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कारण, राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच, जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो… असे म्हणत आपल्या भाषणातील सुरुवातीचा बदल दाखवून दिला. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, अगदी तशीच राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यामुळे, राज यांचे हिंदवी स्वराज्य हे बाळासाहेबांच्या संघटनेप्रमाणेच चालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *