‘हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?’ :- राज ठाकरे
मुंबई दि.०२ :- कोरोना संचारबंदीत जर ‘हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. या
#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday pic.twitter.com/lSpdMbNTKl
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 2, 2020
राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे, यात “कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? ह्या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
हेही वाचा :- तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; पोलिसासह १८ जणांवर गुन्हा दाखल
मनसेचे अधिकृत ट्विटर अकाउंट ‘मनसे अधिकृत’ वर राज यांनी, देशात सुरू असलेल्या लॉकडाउनवरूनही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करत, “कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील.
#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदिन #मनसे #RajThackeray #MaharashtraDharma #maharashtraday pic.twitter.com/E3iiH4tZhw
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 2, 2020
अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का?”, असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.