क्लस्टर पात्र इमारतींवर रस्तारुंदीकरणाची कारवाई नको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवावासीय उभारणार मानवी साखळी

दिवा शहरातील दिवा-शीळ स्टेशन रस्त्यावर दिवा पूर्व आणि दिवा पश्चिम दिशांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाला पालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली असून दिवा स्टेशन रोड वर रस्तारुंदीकरणाची मोहीम देखील पालिकेतर्फे घेण्यात येणार आहे. या रस्तारुंदीकारणात स्टेशन परिसरातील जवळजवळ २३ इमारती बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या सर्व इमारती व आसपासचा परिसर हा यापूर्वीच क्लस्टर योजनेत पात्र ठरला असून क्लस्टर योजनेत येणाऱ्या सर्व रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे आताच या बाधित इमारतींवर रुंदीकरणाची कारवाई करू नये या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यातील सर्व रहिवासी शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी दिवा स्टेशन रस्त्यावर मानवी साखळी उभारून आंदोलन करणार आहेत तसे पत्र राहिवाशांतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.

हेही वाचा :- मातृत्व शिबिराचे उरण मध्ये आयोजन

ठाणे महानगर पालिकेतर्फे ठाणे पालिका कार्यक्षेत्रात ४४ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून त्याचे वेगवेगळे URP तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी तातडीचे म्हणून सहा ठिकाणांचा पायलेट प्रोजेक्ट म्हणून समावेश करून त्यापैकी किसननगर आणि हाजुरी विभागाला तत्वतः मंजुरी देऊन कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर क्लस्टर योजनेत अनधिकृत, धोकादायक, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हे सर्व हटवून त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्र घरे बांधून त्यांचे तिथेच पुनर्वसन केले जाणार आहे. सदर योजनेत चार FSI देण्यात येणार असल्यामुळे खूप मोकळी जागा उपल्बध होणार असून उद्याने, आरोग्य केंद्र, पार्किंग, सरकारी कार्यालये, समाज विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच रस्ते मोठे होतील व नाल्यांची पुनर्बांधणी होणार आहे. एकंदरीत नियोजनबद्ध विकास होऊन वस्तीत व अनधिकृत इमारतीत राहणाऱ्यांना चांगले घर व दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आमचा हा हक्क हिरावून घेऊ नये असे बाधित रहिवासी सौ. उषा पगारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :- बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान

दिवा शीळ स्टेशन रस्ता हा विभाग URP 41 part(1) या मध्ये मोडत असून भविष्यात ह्या विभागात क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या विभागातील नागरिकांना एकत्र घरे बांधून तिथेच पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या बाधित दिवावसीय नागरिकांचा हा हक्क हिरावून न घेता या विभागाचा पायलेट प्रोजेक्ट मध्ये समावेश करून या विभागाच्या URP ला तात्काळ तत्वतः मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपा दिवा शीळ अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी आयुक्तकडे यापूर्वीच केली आहे. शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी दिवेकारांसोबत असेल असे देखील अँड.आदेश भगत यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.