हॉलिवूड गायक जस्टिन बीबर विवाहीत… सोशल मीडियावर पत्नीबाबत खुलासा
मुंबई – जस्टिन बीबर यानं आपण विवाहीत असल्याचा खुलासा केलाय. जस्टिननं गर्लफ्रेंड आणि मॉडल हॅली बाल्डविन हिच्यासोबत आपण विवाह केल्याचं सोशल मीडियावर कबूल केलंय. काही दिवसांपूर्वी दोघांना एकत्र न्यूयॉर्क सिटीच्या कोर्टहाऊसमध्ये विवाह लायसन्स जारी करताना पाहिलं गेलं होतं… त्यानंतर दोघांच्या नात्यासंबंधी उत्सुकता ताणली गेली होती.
हेही वाचा :- 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा”, – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आता खुद्द जस्टिननंच एका फोटोसहीत हॅली आपली पत्नी असल्याचं मान्य केलंय. जस्टिननं इन्स्टाग्रामवर आपला आणि हॅली बाल्डविन हिचा एक फोटो शेअर केलाय… या फोटोला त्यानं कॅप्शन दिलंय ‘माझी पत्नी अद्भूत आहे’ पॉपस्टार जस्टिन बीबरनं काही दिवसांपूर्वी संगीतापासून विश्राम घेण्याची घोषणा केली होती. स्वत:च्या शोधासाठी आपण संगीतापासून थोड्या काळासाठी विलग होणार असल्याचं जस्टिननं म्हटलं होतं.