अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुट्टी

 

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी राज्य शासनाकडून येथे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

३ नोव्हेंबर रोजी अंधेरीतील केंद्रीय-राज्य सरकारी कार्यालये, निमशासकीय, सार्वजनिक कार्यालये तसेच बँकांना सुट्टी असणार आहे.

महामुलाखतीचा महाफुसका बार – शेखर जोशी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा शिवसेनेची असल्याने पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनीही ही
प्रतिष्ठेची केली आहे.‌

मुंबई विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाने तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तब्बल २४ अपक्ष उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
——–

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.