मुंबई शहरात १७ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारणार
मुंबई सेंट्रल,परळ आणि दादर येथील बसस्थानकांत काम सुरू
मुंबई दि.१३ :- राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाने मुंबई शहरात एकुण १७ ठिकाणांवर हिरकणी कक्षाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी मुंबई सेंट्रल,परळ आणि दादर येथील बसस्थानकांवर आई आणि तिच्या तान्ह्या बाळासाठी स्तनपान कक्ष उभारण्याचे काम सुरु आहे.
‘सीटबेल्ट अलार्म’ बंद करणा-या उपकरणाची विक्री, जाहिरात बंद करण्याचा आदेश
मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन समितीने मुंबई शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी १७ हिरकणी कक्ष मंजूर केले आहेत. यापैकी एसटी महामंडळाच्या पाच बस स्थानकापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बस स्थानक या तीन बस स्थानकावर हिरकणी कक्षांची उभारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.
जी २० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत
मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बसस्थानकांत प्रत्येकी १५० चौरस फूटांचे एसी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्यांना स्तनपान करता यावे, यासाठी राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुंबई शहरात एकूण १७ ठिकाणांवर ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.