हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम रद्द

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाला यश

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.‌१९ :- हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे विरोध केल्यामुळे हिंदूद्वेषी वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांचे मुंबईत होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासन आणि आयोजक यांनी हे कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीसपत्रकात दिली आहे.

येत्या २४ नोव्हेंबर या दिवशी शीव येथील षण्मुखानंद सभागृहात वीर दासचा कार्यक्रम, तर २७ नोब्हेंबर या दिवशी वांद्रे येथील ‘आर.डी. नॅशनल कॉलेज’ येथे मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम होणार होता. या दोन्ही कार्यक्रमांना हिंदुत्वनिष्ठांनी कायदेशीर मार्गाने विरोध केला. हिंदु जनजागृती समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, मानव सेवा संघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी वीर दास याच्या विरोधात शीव पोलीस ठाणे, मुंबई पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. तर मुनव्वर फारूकी याच्या विरोधातही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

यासह दोन्ही कार्यक्रमाच्या स्थळी हिंदुत्वनिष्ठांनी आयोजकांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली होती. कार्यक्रम रहित न केल्यास हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर हे दोन्ही कार्यक्रम रहित झाले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. कॉमेडी’च्या नावाखाली सातत्याने हिंदू देवता आणि श्रद्धास्थाने यांची निंदानालस्ती करणे, याला आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कला स्वातंत्र्य म्हटले जाते. याच अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याच्या बुरखा पांघरून खरेतर यांना हिंदुद्वेष पसरवायचा असतो, हेच दिसून येते. हिंदूंनी हे किती दिवस सहन करावे ? यापुढे हिंदु समाज श्रद्धास्थानांचा अवमान सहन करणार नाही, असा इशाराही या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.