उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह हे किडनी फेल्युअरला जबाबदार -डॉ. दिनेश महाजन

डोंबिवली दि.१५ – उच्च रक्तदाब आणी अनियंत्रित मधुमेह हे किडनी फेल्युअर जबाबदार आहेत. देशातील नव्वद टक्केरुग्णांना किडनी फेल्युअरचे होण्याचे ही दोन करणे आहेत आज ३० ते ३५ वयोगटातील तरुण पिढीला सुद्धा या विकाराने पछाडले आहे.तर किडनी फेल्युअर वरील उपचार हे खर्चिक आहेत. डायलिसीस वेळेवर करून घेणे महत्वाचे आहे.इतरांनी वर्षातून एकदा आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी तसेच डायलिसीस आणि उच्च रक्तदाब रुग्णांनी वर्षातून एकदा किडनीची तपासणी करून घेतली पाहिजे, अशी माहिती डॉ.दिनेश महाजन यांनी डोंबिवलीत दिला. जागतिक किडनी दिनानिमित्त डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने किडनीचे विकार आणि उपाय या विषयावर वार्तालाप घेण्यात आला होता. यावेळी दिशा डायबेटीस व किडनी केअर येथील डॉ. दिनेश महाजन यांनी यावर सविस्तर माहिती दिली. हल्लीची लाईफस्टाईल बदल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळाले आहे.किडनी विकार होऊ नये यासाठी जेवणात बदल, आहार,साखरेवर कंट्रोल,उच्च रक्तदाबावर कंट्रोल हे सर्व करणे अतिमहत्वाचे आहे.

हेही वाचा :- शरद पवारांनी दिला निवडणुका जिंकण्याचा मंत्र

जेवणात हिरव्या पालेभाज्या तर आठवड्यातून एकदा नोंनवेज खावेत. दिवसातून २ ते अडीच लिटर पाणी प्यायले पाहिजे. सकाळी ४५ मिनिटे चालावे यामुळे अनेक आजार टळू शकतात.भारतात १०० पैकी १७ जणांना किडनीचे विकार आहेत.गेल्या चार ते पाच वर्षात डायलिसीचे रुग्ण एवढे वाढले आहेत. ग्रामीण भागात हि याचे प्रमाण वाढत चालले आहे.विशेष म्हणजे `डायलिसीस फोबिया`बद्दल बोलायचेझाल्यास यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.आपले सरकार किडनीच्या रुग्णांना शकत तितकी मदत करत आहे.पंरतु सर्व गोष्टी सरकारवर अवलंबून न राहता किडनीचे विकार होऊ नये म्हणून योग्यची खबरदारी घेतली पाहिजे.ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांनी डॉ. दिनेश महाजन यांचे स्वागत केले तर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांडू यांनी प्रास्ताविक केले.पत्रकार शंकर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. जगात भारत देश हा सर्वात जास्त तरुणांचा देश बनणार आहे. त्यामुळे तरुणांना अनेक आजारांपासून लांब ठेवले पाहिजे. त्यासाठी तरुणपिढीने लाईफस्टाईल बदलली पाहिजे. देश महासत्ता होत असताना तरुणवर्ग सुदृढ बनली पाहिजे असे डायबेटीस व किडनी केअर येथील डॉ.दिनेश महाजन यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email