* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> सराईत गुन्हेगाराला मदत करणे पडले महागात, पोलीस निरीक्षक निलंबित – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

सराईत गुन्हेगाराला मदत करणे पडले महागात, पोलीस निरीक्षक निलंबित

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींना मदत करणे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना चांगलेच महागात पडले आहे. आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी यांना निलंबित करण्यात आले होते.

हेही वाचा :- ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार ! ७५ वर्षीय वकिलावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीचे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये यासाठी मदत केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सानप दोषी आढळून आले आहेत. यानंतर अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. श्रीरामपूर शहरातील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्यावर तीन वर्षे अत्याचार केले. याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करत आहेत.

हेही वाचा :- मृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना CSR फंडातून आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी

या प्रकरणाचा तपास करत असतानाच असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. परंतु त्याची दखल श्रीरामपूरात घेतली नाही. म्हणून फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता पोलीस निरीक्षक सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *