कल्याण ; भरधाव बसच्या धडकेत हमाल जखमी

कल्याण दि.२८ – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील राजेंद्र खरात हे स्टेशन वर हमालीचे काम करतात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खरात स्टेशन वर हमालीचे काम करून परतत असताना पश्चिमेकडील साधना हॉटेल समोर रस्ता ओलांडत होते.

हेही वाचा :- कल्याण ; भरधाव कारची दुचाकीला धडक

यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बस ने त्यांना धडक दिली व बस चालक पळून गेला. या अपघातात खरात यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी खरात यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email