कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार यांची हॅटट्रीक!

कल्याण दि.२५ :- गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच विकास कामे केली नाहीत हाच प्रमुख मुद्दा घेऊन आमदार गणपत गायकवाड यांचा पराभव करण्याचे बंडखोरीच्या माध्यमातून शिवधनुष्य उचलुत आमदार गणपत गायकवाड यांना या विधानसभा निवडणूकीत चारीमुंडया चित करण्यासाठी एकवटलेल्या कल्याण पूर्वेतील सर्व शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना धुळ चारत आमदार गणपत गायकवाड यांनी साडेबारा हजारांच्या फरकांनी दणदणीत विजयी संपादन केला आहे.

हेही वाचा :- व्यवसाय सुलभीकरणात भारताची झेप, जागतिक यादीत 77 व्या स्थानावरून 63 स्थानावर

या मतदार संघात ही निवडणूक केवळ मात्र भाजप आणि शिवसेनेतच झाल्याचे निकाला अंती स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणपत गायकवाड यांनी मतांची आघाडी घेत अंतीम विजयी संपादन केला आहे . या मतदार संघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते . या पैकी खरी लढत शिवसैनिकांचे उमेदवार धनंजय बोडारे आणि गणपत गायकवाड झाल्याचे मतमोजणी दरम्यान स्पष्ट झाले. गणपत गायकवाड यांना ६०००५ मते पडली तर धनंजय बोडारे यांना ४७६०८ मते पडली. या मध्ये गणपत गायकवाड यांनी १२३०७ मतांची आघाडी घेऊन विजयी संपादन केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email