नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते!

‘सतत सुख अनुभवण्याची ओढ’, ही मानवाच्या प्रत्येक कृतीमागील प्रेरणा असते. असे असूनही संपूर्ण मानवजात ज्यासाठी आसूसलेली आहे, त्या ‘आनंदप्राप्ती’ या विषयावर सध्याची विद्यालये आणि महाविद्यालये यांमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. नामजप आणि स्वभावदोष-अहं निर्मूलन यांचा अंगिकार केल्यास सर्वोच्च अन् कायमस्वरूपी टिकणारे सुख, म्हणजेच आनंदप्राप्ती होऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. स्वाती मोदी यांनी केले. त्या १५ व १६ नोव्हेंबर या दिवशी जयपूर येथे संपन्न झालेल्या ‘सौंदर्य २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘Iconference, नवी देहली’ यांनी केले होते. डॉ. मोदी यांनी या परिषदेत ‘तणावग्रस्त जगात आनंद आणि शांती यांचा शोध’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून, डॉ. स्वाती मोदी आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

हेही वाचा :- मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध जखमी

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा 57 वा शोधनिबंध होता. याआधी 14 राष्ट्रीय आणि 42 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी 3 आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. स्वाती मोदी पुढे म्हणाल्या की, जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी होतो. परिणामस्वरूप स्वतःची मनःशांती आणि सुख यांवर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या जीवनातील समस्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी ३ मूलभूत कारणे असतात. जीवनातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समस्या आध्यात्मिक कारणांमुळे असतात; परंतु त्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतात. ही आकडेवारी आध्यात्मिक संशोधनातून प्राप्त झाली आहे. प्रारब्ध, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती, ही ३ प्रमुख आध्यात्मिक कारणे होत.

हेही वाचा :- सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर आता तरी राज्यपाल कोशयारी राज्यपाल पदाचा सन्मान राखणार का ?

समस्येच्या निवारणासाठी समस्येच्या कारणाच्या स्तरानुसार उपाय करावा लागतो. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा उपाययोजनाही आध्यात्मिकच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपायांनी शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्येही साहाय्य होते, विशेषतः जेव्हा या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते. डॉ. स्वाती मोदी यांनी आनंदप्राप्ती करण्यासाठी दोन प्रमुख प्रयत्न या वेळी सांगितले. एक नामजप, जो प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मानुसार करू शकते. आजच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा एक अत्यंत उपयुक्त नामजप आहे. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करतो. तसेच दुसरे म्हणजे स्वभावदोष निर्मलन प्रक्रिया, याद्वारे मनातील स्वभावदोषांचे संस्कार नष्ट होऊ शकतात. याप्रमाणे व्यक्तीने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला आनंस्वरूप ईश्‍वराची नक्कीच अनुभूती येईल, असेही डॉ. मोदी यांनी या वेळी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email