* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’- रमेश शिंदे – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’- रमेश शिंदे

मुंबई दि.२७ :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बंदी आणून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या प्रकारे मोगलांच्या काळात ‘जिझिया कर’ होता तसा आत्ताच्या काळात ‘हलाल सर्टिफिकेशन’ हा खाजगी कर इस्लामी संस्थांनी लागू केला आहे. याला भारत सरकारची कुठलीही मान्यता नाही. ‘हलाल सर्टिफिकेशन’मधून मिळालेला पैसा हा विविध बॉम्बस्फोटातील आतंकवाद्यांना सोडवण्यासाठी वापरला जातो.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

हिंदु व्यापार्‍यांवर सक्तीने लादलेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणली, तर  भारताच्या सुरक्षेशी होणारा खेळ थ तसेच हिंदु व्यापार्‍यांचे आर्थिक शोषण थांबेल. ‘हलाल सर्टिफिकेशन’च्या नियमांमध्ये उत्पादकांनी त्यांच्या आस्थापनात दोन मौलानांची नेमणूक करावी, असा जाचक नियमही लागू केला होता; आता उत्तर प्रदेशमध्ये तरी हा ‘लादलेला रोजगार’ थांबवला जाईल. उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली.

मराठा समाजाचे मागासलेपण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग ४०० कोटी रुपये देण्याची मागणी करणार

हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित ‘हलाल व्यापारावर योगीजींचा प्रहार !’ या विषयावरील आयोजित विशेष संवादात बोलत होते. भारतात सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणिकरण करणार्‍या संस्था असतांनाही ‘हलाल’च्या नावे खाजगी इस्लामी संस्था हलाल प्रमाणपत्राची सक्ती करून हिंदू व्यापार्‍यांचे शोषण करू लागल्या. ‘हलाल सर्टिफिकेट’ ही बाहेरील इस्लामिक देशांची आवश्यकता आहे. ‘हलाल सर्टिफिकेट’ हे गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांना पण दिले जाते, हे आम्हाला सुद्धा माहिती नव्हते. असे कुठे आमच्या पंथात लिहिलेही नाही’, असे मुस्लिम महासंघाने आता जाहीर केले आहे.

निःशुल्क आरोग्य सेवेसाठी महापालिकाह रुग्‍णालयात “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबवावी

‘जमियत-उलेमा-ए-हिंद’च्या ‘हलाल सर्टिफिकेटन’ला शिया मुसलमानबहुल देशात मान्यता नाही. हलाल सर्टिफिकेट ‘डेटिंग वेबसाईट’, ‘लिपस्टिक’सारख्या वस्तूंवर का लादले गेले, हेही समाजासमोर यायला हवे, असेही शिंदे यांनी सांगितले. हलाल मांसाच्या विक्रीवर उत्तर प्रदेश सरकारने कुठेही बंदी घातलेली नसून अन्य जीवनावश्यक उत्पादनांवर बेकायदेशीरपणे लागू केलेल्या ‘हलाल सर्टिफिकेटन’वर बंदी घातली आहे. अशा ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर ग्राहकांनी बहिष्कार घालायला हवा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *