गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले – १ आणि ५ डिसेंबरला मतदान, ८ डिसेंबरला मतमोजणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.०३ :- भारतीय जनता पक्षासाठी ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असणाऱ्या गुजरात राज्यामध्ये येत्या १ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.‌ पहिल्या टप्प्यांत ८९ तर दुसऱ्या टप्प्यांत ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे.‌

हेही वाचा :- संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी पत्रकार परिषदेत गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार मतदानाचा अधिकार बजाविणार आहेत. यात ४.६१ लाख तरुण मतदार असून ३.२४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.‌

हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेली २५ वर्षे गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे.‌ गुजरातमध्ये आत्तापर्यंत भाजप विरुद्ध कॉंग्रेस असाच सामना झाला. या विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘आप’शीही संघर्ष करावा लागणार आहे. या निवडणूक निकालाचा परिणाम २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.