विविध परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थांचे घवघवीत यश पालकमंत्र्यांनी केले विद्यार्थांचे कौतुक
ठाणे दि १५ – ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादक केले असून जिल्ह्याचा झेंडा राज्य – राष्ट्रीय स्तरावर रोवला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या गुणवंत विद्यार्थांचे कौतुक ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी संगीता भागवत उपस्थित होते.
हेही वाचा :- वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने पूर्व उच्च माध्यमिक ( पाचवी ) , पूर्व माध्यमिक ( आठवी ) शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०१७ –१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून एकूण १९ हजार ८४१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७८५ विद्यार्थांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली असून राज्य स्तरावर गुणवत्ता यादीत इशान हर्षवर्धन सुभेदार , यश योगेश स्वर, प्रथमेश भालचंद्र कुलकर्णी , अक्षय संदिप सम्सी या चार विद्यार्थांची निवड झाली.
हेही वाचा :- विद्युत अपीलीय न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष
तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १३ हजार ९८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६५६ विद्यार्थांना शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तसेच राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ऋतुजा पद्माकर लहाने, दीर्घा समीर कुलकर्णी, निशांत जयेश भावे या तीन विद्यार्थांची निवड झाली.
प्रज्ञा शोध परीक्षेत विद्यार्थांचे यश
सन २०१६ – १७ वर्षात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत १६ विद्यार्थांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. तर सन २०१७-१८ वर्षा करिता घेण्यात आलेल्या या परीक्षेत राज्यस्तरावर 18 विद्यार्थांची निवड होऊन ते राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.