भारतात मधुमेहापाठोपाठ कॅन्सरग्रस्त रुग्णांत वाढ – डॉ.अनिल हेरूर

डोंबिवली दि.१६ – आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतात मधुमेहाच्या रुग्णाची संख्या वाढत असून त्या पाठोपाठ कॅन्सरग्रस्त रुग्णात वाढ होत आहे. भारतात १२ लाख कॅन्सरग्रस्त आहेत. हे प्रमाण ४० ते ५९ वर्षापर्यतच्या वयोगात हा आजार वाढत आहे.`गोपाल कृष्ण चॅरीटेबल ट्रस्ट न होप स्माईल सन शाईन`संस्था हे आपल्या परीने पीडितांना आता आधार देण्याचे काम करत आहेत.या रोगाशी झुंजू पाहणारे पण हताश झालेल्यांची शुश्रुषा व काळजी घेतली जाईल व त्यांना वेदनामुक्त ठेवता येईल त्यासाठी एक स्थाई स्वरूपाचे केंद्र सुरु करण्याच्या मानस असल्याचे डॉ. अनिल हेरूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ.अनिल हेरूर म्हणाले, ग्रामीण भागात कॅन्सर तपासणी व डोळे तपासणीची सोय नाही.या आजारांना वेळत निदान होणे आवश्यक आहे तरच कॅन्सरसारख्या आजारांवर मात करता येईल.आपल्या देशात कॅन्सरचे रुग्ण वाढत असून कॅन्सरग्रस्तांना जेवढया सोई सुविधा दिल्या पाहिजेत तेवढया सरकार देत नाही.

हेही वाचा :- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत चित्रकला स्पर्धा

अज्ञान,भिती व इतर उपचार यामुळे कॅन्सरच्या आजाराचे रुग्ण वाढत आहे. आपल्या परिसरातही कॅन्सरचे रुग्ण वाढत असून आज उपचार करणारे डॉक्टर्स आहेत,रुग्णालये आहेत, मात्र रुग्णांचा आजार बळावतो. तेव्हा त्याची देखभाल करण्याची सेाय नाही. यासाठी गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट व होप स्माईल सन शाईन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या रोगाशी झुंजू पहाणारे पण हताश झालेल्या रुग्णांची शुषुश्रा व काळजी घेऊन वेदनामुक्त ठेवता येईल यासाठी स्थाई स्वरुपाचे केंद्र सुरु करण्यात येणार असून या संस्थेच्या मदतीसाठी येत्या ५ जानेवारी रोजी कल्याण्याच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात दोनच रेडिएशनची मशिन असून सरकारी रुग्णालयात या यंत्राची गरज आहे. कारण कॅन्सरचे रुग्ण वाढत असून देशात १२ लाख रुग्ण असल्याचा अंदाज असून तोंडाचा,फुफ्फुसचा ,ब्रेस्ट व गर्भाशय या कॅन्सरचे रुग्ण वाढत असून ४० ते ५९ वर्षापर्यतच्या वयोगात हा आजार वाढत असल्याचे त्यांनी संगीतले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email