अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कृतीशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.१८ :- अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा कटाक्ष आहे. त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कृतीशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात राज्य शासन, बृहन्मुंबई महापालिका व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समावेश- मेकिंग मुंबई इनक्ल्युझिव्ह मोहिमेचा शुभारंभ तसेच अपंगांना व्हिलचेअर वितरण, त्यांच्या बास्केटबॉलचा विशेष सामना या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मंत्रालयातील इंटरनेट सेवा मंगळवारपासून बंद
स्वतंत्र अपंग कल्याण विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे. हा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून या विभागामार्फत सद्यस्थितीत अपंगांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने विविध विषय हाताळण्यात येत आहेत. अपंग खेळाडूंना क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी, विविध खेळ खेळण्यासाठी महपालिकांची उद्याने, इतर मैदाने ,जागा येथे आवश्यक सुविधा उपबल्ध करुन देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
रे रोडच्या ११२ वर्षे जुन्या पुलाच्या दगडांचा कल्पक व अभिनव वापर
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,सहकार मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव,मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रोजेक्ट मुंबई उपक्रमाचे संस्थापक शिशिर जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते. आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे उद्योजक जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कल्याण निधीसाठी ५१ कोटी रुपये आणि पोलीस कल्याण निधीसाठी २५ कोटी रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केले.