मुंबई दि.३१ :- महाराष्ट्र राज्य शासनाने गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर केली आहे. येत्या ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत शासकीय विमा कवच लागू असणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला कृष्ण जन्माष्टमी असून ७ सप्टेंबर रोजी दहीहंडीचा आहे.
त्या पार्श्वभूमीवर हा राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात २५ हजार गोविंदांची भर पडल्याने आता एकूण ७५ हजार गोविंदांना या विम्याचे कवच मिळणार आहे.