राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेत 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार
नवी दिल्ली, दि.०६ – भारतातील 13 राज्यांमधल्या ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पासाठी 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार झाला आहे. नवी दिल्लीत काल या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
हेही वाचा :- सशस्त्र दलांमध्ये महिलांना परमनंट कमिशन
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना कृषी आणि कृषीतर उत्पादनांसाठी व्यवहार्य उद्योग विकसित करण्यासाठी सहाय्य मिळेल. महिलांच्या मालकीच्या आणि महिलांच्या नेतृत्वाखालील कृषी आणि कृषीतर उद्योग उभारण्यावर या प्रकल्पाचा भर राहील. सध्या देशातल्या 13 राज्य 162 जिल्हे आणि 575 गटांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प राबवण्यात येत आहे.
Please follow and like us: