भारतीय सहकार क्षेत्राच्या विकासात ‘वामनीकॉम’ची महत्त्वपूक्षेत्राच्यर्ण भूमिका-राधा मोहन सिंग
नवी दिल्ली, दि.१५ – भारतीय सहकार क्षेत्राच्या विकासात वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वामनी कॉम) महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी म्हटले आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवस्थापकांची प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि कृषी संबंधी धोरण निर्मितीत युवकांना प्रशिक्षण देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. पुण्यात आज ‘वामनीकॉम’च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषीमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यात सहकार क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वामनीकॉमच्या आंतरराष्ट्रीय हॉस्टेलची पायाभरणीही केली.
Please follow and like us: