जलवाहतूक योजनेत शासनाची दिरंगाई खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उठवला आवाज

डोंबिवली दि.०६ :- ठाणे, कल्याण आणि वसईच्या दरम्यान ५० किलोमीटर्सच्या अतिशय महत्वाच्या अशा अंतर्गत जल-वाहतूक सुरु करण्याच्या संदर्भात शासनाने अक्षम्य अशी दिरंगाई केली असल्यामुळे आणि वाढत्या नागरीकरणामुळे जनतेच्या रोजच्या वाहतूक त्रासाला अंत दिसत नाही. माझ्या मतदारसंघातील मतदारांना केवळ रेल्वे आणि रस्ते हेच वाहतूक मार्ग आहेत आणि ते कायम कमी पडत असताना शासनाने जलवाहतुकीला प्राथमिकता द्यायला हवी आहे, असे प्रतिपादन कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत केले.

हेही वाचा :- हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींयांच्या एनकाउंटर

तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६५० कोटी मंजून केले होते. त्याचा विकास प्रकल्प अहवालदेखील तयार झाला होता. लोकसभा निवडणुका आल्यामुळे भूमिपूजन मात्र मार्चमध्ये होऊ शकले नाही. नवीन शासन आसनस्थ झाल्यावर आम्ही मंत्री मनसुखलाल मदविया यांची भेट घेतली. त्यांनी जून महिन्यातच तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा :- कंत्राटदाराकडून कमिशन घेण्याच्या संदर्भात पतीसह नगराध्यक्ष बायकोला अटक

तीन महिन्यांच्या आत काम सुरु करण्याचे आदेश देखील त्यांनी पारित केले. ठाणे महानगरपालिकेने दोन टप्प्यांमध्ये जल-वाहतूक प्रस्तावित केली होती. वसई-ठाणे-कल्याण हा पहिला तर ठाणे नवी मुंबई हा दुसरा टप्पा होता. याचा देखील विकास प्रकल्प अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तयार होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप देखील पाहिल्या टप्प्याचेच काम सुरु झालेले नसल्याने आणि रस्ते आणि रेल्वेमार्गाची कोंडी वाढती असल्याने या बाबतीत ताबडतोब कारवाई करण्याची आणि काम सुरु करण्याची जोरदार मागणी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.