डोंबिवलीत आज भव्य डॉगशो
Hits: 4
डोंबिवली दि.१९ :- प्रीमियम पेट्स आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रविवारी १९ जानेवारीला डीएनसी हायस्कूल पटांगण येथे दुपारी तीन वाजल्यापासून भव्य डॉग शो आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध जातीचे असंख्य तीनशेहून अधिक डॉग भाग घेणार आहेत. निरनिराळ्या प्रकारचे मजेदार कपडे घालून स्टेजवर डॉग त्यांच्या मालकांची बरोबर फॅशन शोमध्ये भाग घेणार आहेत.
हेही वाचा :- बापू नाडकर्णी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली क्रिकेटला लोकप्रियतेचे वलय देणारा महान खेळाडू गमावला : अजित पवार
याबाल वृद्धांसाठी ही एक पर्वणी आहे तसेच बर्फाळ प्रदेशातील सायबेरियन हस्की, उंदराच्या आकारातील सर्वात लहान चुवाहुआ डॉग, अफगाणिस्तानमधील अफगान हौंड, माऊंटन विभागातील सेंट बर्नार्ड, सर्वात उंच ग्रेट डेन आणि पोलिसांकडे असणारे लाब्राडोर असे निरनिराले प्रकारचे तीनशेहून अधिक डॉग बघायला मिळणार आहेत. जर्मन शेफर्ड रॉटविलर डॉबरमॅन डॉग यांचे काही थरारक प्रात्यक्षिके ही दाखवण्यात येणार आहे.
हेही वाचा :- Dombivali ; पतंगाचा मांजा ठरला पक्षांसाठी कर्दनकाळ धारदार मांज्यामुळे घुबड रक्तबंबाळ
या कार्यक्रमाला पोलिस दलातील पोलिस डॉग ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी असतो. मागील वर्षी या कार्यक्रमाला पाच हजारहून जास्त प्रेमींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मागील वर्षी २५ पेक्षाही जास्त प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती राहिलेली होती. येणाऱ्या कार्यक्रमालाही नामांकित प्रतिष्ठित व्यक्ती यांची हजेरी लागणार आहे.
हेही वाचा :- Dombivali ; पुन्हा लोकलमधून पडून तरुण जखमी
विशेष आकर्षण : मराठी सिने कलाकारांची उपस्थिती मिस्टर एशिया २०१८ १९०० मानकरी हितेन मार्के यांचा जाहीर सत्कार, तसेच मिस्टर इंडिया सिद्धांत जयस्वाल याचा गुणगौरव, बिग बॉस आणि पुढचं पाऊल या टीव्ही सिरीयलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जुही गडकरी ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवी हिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.