‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांसाठीच्या सोडतीला उत्तम प्रतिसाद – अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जून

मुंबई दि.२३ :- ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांसाठीच्या सोडतीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी ६५५ अर्जदारांपैकी २०८ अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली आहे. २६ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

मुंबई – पुणे या मार्गावर जून महिन्याच्या अखेरपर्यंत १०० ईलेक्ट्रिक बसेस धावणार

२६ जूनपर्यंत आलेल्या अर्जदारांची सोडत १८ जुलैला वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. ‘म्हाडाच्’या वांद्रे येथील मुख्यालयात सोमवारी दुपारी मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली.

कामोठे येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबईतील या घरांच्या सोडतीत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे आहेत. सोडतीसाठी नियमावली, मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष आणि आरक्षण प्रवर्ग यासंबंधीची माहिती https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.