चर्चगेट रेल्वे पोलीसांची चांगली कामगिरी
चर्चगेट दि.२९ – रोजी प्रवासी महिला नामे निलम मनिष सोलंकी, वय 42 वर्षे, राहणार गिरगाव मुंबई ह्या त्यांचे पती नामे मनिष सोलंकी यांचे समवेत त्यांचे भाचीच्या लग्ना करिता भाईंदर येथे गेले होते लग्नसोहळा आटपुन भाईंदर येथुन लोकलने गिरगाव मुंबई येथे त्यांचे घरी येत असताना त्यांनी त्यांचे जवळील बँग रॅक वर ठेवली होती. ग्रँन्ट रोड रेल्वे स्टेशन येथे बँग न घेताच सुमारे 21.22 वा उतरून स्टेशन बाहेर गेले.
हेही वाचा :- कल्याण डोंबिवलीत घरफोड्या
सदर बँग मध्ये त्यांचे सोन्याचे 180 ग्रम वजनाचे दागिने व चांदीचे 25भार असे एकूण 6,20,000/-रू किंमतीची दागिने होते. सदरची बँग ही ट्रेनमधेच राहिली असल्याचे लक्षात आल्यावर त्यानी लागलीच चर्चगेट रेल्वे स्टेशनमास्टर येथे जावुन बँगचा शोध घेतला असता मिळुन आली नाही. सदरची बँग ही कर्तव्यावरिल पो.शि. 2476/ दातार याना ट्रेन मिळून आल्याने पोलिस ठाण्यास आणुन पो.उप.नि. बाळासाहेब पवार व पोशि 2476 दातार यांनी सदर बँगेच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना परत केले आहे. सदरची महिला व तिचे पती यानी चर्चगेट रेल्वे पोलीसांचे शतशः आभार मानले आहेत.