श्रावस्ती भवरेला ओलींम्पियाड मध्ये सुवर्णपदक.

उरण दि.१३ – श्रावस्ती प्रशांत भवरे ही ८वी मध्ये शिकणारी सेंट मेरी हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने डिसेंबर 2018 मध्ये सायन्स ओलींम्पियाड फॉउंडेशन तर्फे ‘SOF इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ओलींम्पियाड‘ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तीने राष्ट्रीय स्तरावर रँक 1 मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्रावस्ती भवरे ही डॉ प्रशांत भवरे व डॉ हर्षा भवरे यांची कन्या आहे. डॉ प्रशांत भवरे हे JNPT तील हॉस्पिटल मध्ये सर्जन म्हणून कार्यरत आहेत.श्रावस्ती ही सेंटमेरी हायस्कूल JNPT ची विद्यार्थिनी असून शाळेतील शिक्षकांचे तिला नेहमी मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा :- सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे पदनियुक्तया

शिवाय जसखार गावातील प्राध्यापक राजेंद्र मढवी यांच्या ‘सुपर 30’ क्लासेस मध्ये इयत्ता 8 वीचे स्कॉलरशिपचे धडे घेतानाच तिने इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ओलिंम्पियाड परिक्षेची तयारी प्रा. राजेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती. श्रावस्तीने अनेक मेडल, बक्षिसे यापूर्वीही या क्षेत्रात मिळविली आहेत. श्रावस्तीच्या तिच्या या महत्वाच्या यशा मध्ये तिच्या आई वडिलांचाही महत्वाचा वाटा आहे. श्रावस्तीला सुवर्णपदक मिळाल्याने तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर विविध क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email