पागोटे गावचा वेदांशु तांडेलला ओलींम्पियाड मध्ये सुवर्णपदक.
उरण दि.२३ – वेदांशु प्रशांत तांडेल हा 5 वी मध्ये शिकणारा सेंट मेरी हायस्कूलचा विद्यार्थि असून त्याने डिसेंबर 2018 मध्ये सायन्स ओलींम्पियाड फॉउंडेशन तर्फे ‘SOF इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ओलींम्पियाड’ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने राष्ट्रीय स्तरावर रँक 1 मिळविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वेदांशु हा सेंटमेरी हायस्कूल JNPT चा विद्यार्थि असून शाळेतील शिक्षकांचे त्याला नेहमी मार्गदर्शन लाभले.

शिवाय जसखार गावातील प्राध्यापक राजेंद्र मढवी यांच्या ‘सुपर 30’ क्लासेस मध्ये इयत्ता 5 वीचे स्कॉलरशिपचे धडे घेतानाच त्याने इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ओलिंम्पियाड परिक्षेची तयारी प्रा. राजेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती. वेदांशु ने अनेक मेडल, बक्षिसे यापूर्वीही या क्षेत्रात मिळविली आहेत. वेदांशुच्या या महत्वाच्या यशा मध्ये त्याच्या आई वडिलांचाही महत्वाचा वाटा आहे. वेदांशुला सुवर्णपदक मिळाल्याने त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर विविध क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.