गोदावरी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
‘
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवविणारा निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर
आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचे मूल्य सांगणारा आणि नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सांगितले.
इफ्फीसह न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपला झेंडा रोवला आहे.
‘गोदावरी’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी