स्टार्ट-अप्सना लवकरच जीईएम मंचावर आणले जाणार

नवी दिल्ली, दि.१३ – सरकारी ई-बाजारपेठ (जीईएम) आणि औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग स्टार्ट-अप्ससाठी एक पीओसी (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) विकसित करण्याच्या मार्गावर असून लवकरच स्टार्ट अप्सना जीईएम मंचावर आणले जाईल. सरकारी बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी स्टार्ट अप्ससाठी हे लाँच पॅड असेल आणि जीईएम मंचावर विक्री करायची संधीही त्यांना मिळेल.

हेही वाचा :- खोल समुद्रातील पाणबुडी बचाव प्रणाली भारतीय नौदलात समाविष्ट

सरकारी ग्राहक स्टार्टअप्सनी विकसित केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचा वापर करून प्रतिसाद देतील. जास्तीत जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जीईएम मंचावर आणण्यासाठी अभियान स्वरुपात काम सुरू आहे. जीईएम आता सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत आहे. वाहतूक, निरीक्षण, वेबकास्टींग आणि विश्लेषण सेवा जीईएम मार्फत उपलब्ध होऊ शकतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email