गौरी आगमनासाठी उद्या दिवसभर मुहूर्त- पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

ज्येष्ठा गौरींचं उद्या घरोघरी आगमन होत आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं. उद्या दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणता येतील अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पध्दत आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहुर्तावरच केलं जातं. उद्या दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणता येतील. गौरींचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं. शुक्रवार म्हणजे ६ सप्टेंबर रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं ज्येष्ठा गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर शनिवारी म्हणजे ७ सप्टेंबरला दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email