सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना गणपती बाप्पा पावले दोन महिन्यात वाढला तीनदा पगार….

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.३० – रायगड सुरक्षा मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांनादेखील समान काम समान वेतन या निर्णयानुसार पगार व इतर सुविधा मिळालेच पाहिजे या जिव्हाळ्याच्या मागणीचा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी कामगार मंत्र्याणकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवल्यानंतर रायगड सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना 01 जानेवारी 2019 पासून 22797 ₹/महिना इतके किमान वेतन लागू केल्याचे आदेश रायगड सुरक्षा मंडळाने  24 जून 2019 रोजी जारी केले होते. त्यानुसार रायगड सुरक्षा मंडळामध्ये नोंदीत सर्व सुरक्षा रक्षकांना माहे जून 2019 चा वाढीव दरानुसार दिलेला पगार आणि जानेवारी ते मे या पाच महिन्यांची थकबाकी अशी एकूण 40 ते 50 हजार रुपये इतकी रक्कम जुलै महिन्याच्या शेवटी त्यांच्या बँक खात्यात जमा झाली.

असतांनाच 01 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या सहा महिन्याकरता सुरक्षा रक्षकांना देण्यात येणाऱ्या विशेष भत्त्यामध्ये शासनाने 01 जुलै ते 23 जुलै आणि 24 जुलै ते 31 डिसेंबर अशी दोन वेळा वाढ दिल्यामुळे रायगड सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा एकूण पगार 24000 रुपयांच्या पार झाला आहे.तसे आदेश रायगड सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष श्री.दिनेशचंद्र दाभाडे यांनी 06 ऑगस्ट रोजी जारी केले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये, मिळालेली तीनदा पगारवाढ आणि जुलै 2019 पासून 24 हजार पेक्षा जास्त पगार मिळणार असल्यामुळे रायगड सुरक्षा मंडळाच्या सर्व सुरक्षा रक्षकांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे… आणि आता लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होणार असल्याने आपल्याला गणपती बाप्पाच पावले या श्रद्धेतुन या वर्षीचा गणेशोत्सव सर्व सुरक्षा रक्षकांच्या घरी धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची माहिती उरण मधील कामगार नेते प्रमोद ठाकुर यांनी दिली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email