आजपासून डोंबिवलीकरांना मोफत योगप्रशिक्षण

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०२ – गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात योग विद्या धाम डोंबिवली संस्था डोंबिवली व कल्याण शहरात अनेक ठिकाणी विनामूल्य योग प्रवेश वर्गांचे आयोजन करत असते. याचप्रमाणे यावर्षीही ३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत डोंबिवली व कल्याण शहरात विविध ठिकाणी एकूण ९६ वर्गांचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नाना कुटे यांनी दिली.

हेही वाचा :- गेल्या तीन वर्षात ‘स्फूर्ती’ क्लस्टर्सच्या 111 प्रस्तावांना मंजुरी

संस्थेतर्फे योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग प्रवीण, योग शिक्षक व योग अध्यापक असे योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्यापीठाचे शासनमान्य श्रेणीबध्द अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वर्ग घेतले जातात. आजपर्यंत पंचवीस हजार पेक्षा जास्त साधकांनी याचा लाभ घेतलेला आहे. ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांसाठी योग सोपान व योग संजीवन वर्ग, प्राणायाम साधना आरंभ वर्ग, ओंकार व ध्यान वर्ग घेतले जातात. अधिक माहितीसाठी व्यंकटेश ९८१९८३७१०७ वरसंपर्क साधावा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email