एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१८ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.‌ गेल्या ५२ दिवसांत १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती.

हेही वाचा :- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता

राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ कालावधीत ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला. १६ ऑक्टोबरपर्यंत या योजनेतंर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ झाली आहे.

हेही वाचा :- दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात ११० बस दाखल होणार

प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यानंतर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.