‘आम आदमी’ पक्षातर्फे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२६ :- ‘आम आदमी’ पक्षाच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्ताने डोंबिवली शाखेतर्फे उद्या (२६ नोव्हेंबर) मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  हे शिबिर सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा यावेळेत महात्मा फुले रस्ता, रेतीभवन समोर, डोंबिवली (पश्चिम) येथे होणार आहे.‌

दरम्यान २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष अक्षरा पटेल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.