चार मोटारसायकल बेपत्ता

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून एकाच दिवशी चार मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाने आपली मोटारसायकल कल्याणच्या दीपक हॉटेल समोरील रिक्षा स्टँडजवळ रस्त्यावर पार्क केली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील रिजेन्सी गार्डनमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने आपली मोटारसायकल खडकपाडा येथील साई महादेव हॉटेल समोरील रस्त्यावर पार्क केली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत कल्याणच्या मिलिंद नगरमधील सुगंधा इमारतीत राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने आपली मोटारसायकल कल्याण पूर्वेतील एफ केबिन जवळील हनुमान मंदिरसमोर पार्क केली असता चोरीला गेली.

याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौथ्या घटनेत ठाकुर्ली येथील कांचनगाव येथील सर्वोदय मंगल इमारतीत राहणाऱ्या 31 वर्षीय तरुणाने आपली मोटारसायकल 90 फुटी रस्त्यावर म्हसोबा चौक येथे पार्क केली असता चोरीला गेली.याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email