मुंबईत आजपासून आणखी चार इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस सुरू
मुंबई, दि. २३
मुंबईत आजपासून आणखी चार इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस सुरू झाल्या आहेत. मुंबईतील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची एकूण संख्या आता सहा झाली आहे.
सध्या दोन इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस नोकरदार जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कफ परेड, वर्ल्ड ट्रेड सेंटर मरिन ड्राईव्ह या मार्गावर चालविल्या जातात.नव्या दोन वातानुकूलित डबल डेकर पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
चार नवीन ई-डबल डेकर बसगाड्या आर.सी चर्च ते ताडदेव, कुर्ला ते वांद्रे , कुलाबा ते वरळी, चर्चगेट ते नरिमन पॉइंट अशा चार मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे भाडे ५ किलोमीटरपर्यंत ६ रुपये इतके आहे.