माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

मुंबई दि.२४ :- काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

इयत्ता १२ वीचा निकाल उद्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजी पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसीला ९ एप्रिल रोजी उत्तर मिळाले व या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांंनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन त्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.