माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची शहीद जवानांना ५१ हजार रुपयांची सहाय्य निधी मदत
डोंबिवली दि.२० – काश्मीर येथील पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेळल्या जवानांना माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी ५१ हजार रुपयांची सहाय्य निधी मदत जाहीर केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत रोहिदास जयंती तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहीद जवानांना आपल्या परीने आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी माजी मंत्री पाटील यांनी डोंबिवलीकरांना केले.
हेही वाचा :- डोंबिवलीत ; तरुणवर्गात घटस्फोटाचे प्रमाण वाढतय असून यात तरुण विवाहित मुलींचे प्रमाण अधिक…
यावेळी खंबाळपाडा –कांचनगाव प्रभाग क्र.४६ चे भाजप नगसेवक साई शेलार, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शशिकांत कांबळे, नगरसेवक संदीप पुराणिक, डोंबिवली शहर महिला अध्यक्षा पूनम पाटील, अँड.माधुरी जोशी, वर्षा परमार, राजू शेख, दिलीप भंडारी, चंद्रकांत पगारे, कैलास डोंगरे, अमोल तायडे, रुपेश पवार, प्रवीण कुडूसकर, रवी पवार, कैलास काळे, गुरुनाथ कपडे, बोहरी समाजाचे फकरुद्दीन जावेदवाला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील म्हणाले,देशाच्या नागरिकांच्या रक्षणासाठी सैनिक कायम सीमेवर असतो. अचानक हल्ला झाल्यावर सैनिकांना वीरमरण येते. या सैनिकांसाठी नागरिकांनी मदत केली पाहिजे. शहीद जवानांना ५१ हजार रुपयांची सहाय्य निधी मदत जाहीर करतो.तर कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले,आपल्या देशात दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक वेळेला सिद्ध झाले आहे. पाकिस्तानला आता जश्याच तसे उत्तरे देण्याची वेळ आली आहे.तर शशिकांत कांबळे म्हणाले,पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.