अनिल देशमुखांच्या फार्म हाऊसवर वन विभागाचा छापा; काळ्या जादूसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ काड्या जप्त

 

काळी जादूच्या होम हवणसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ पांढरी काड्याचा लाखोंचा साठा अनिल देशमुख यांच्या फार्म हाऊसवर वन विभागाने धडक कारवाई करत जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बांधनपाडा गावाशेजारी गावातीलच व्यक्ती अनिल देशमुख यांचे फार्महाऊस आहे. ही धडक कारवाई तेथेच करण्यात आली आहे. या प्रकरणी वन कायद्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वन अधिकारी व पोलिसांनी संयुक्त तपास सुरु केला आहे.

आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत गोरख धंदा सुरू- ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील वनक्षेत्र डोळखांब हद्दीतील आजोबा पर्वत रांगामध्ये दुर्मिळ पांढरीची लाकडे आढळून येतात. या पांढरी काड्याचा उपयोग धार्मिक विधी, होम हवन व कोरीव काम करण्यासाठी करण्यात येतो. त्यातच अनिल देशमुख यांच्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर या काड्याचा बेकायदेशीर साठा साठवून त्याची विक्री केली जात असल्याची खबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली होती. या माहितीच्या आधारे फार्महाऊसवर वन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्या दरम्यान पांढरीची लाकडे तोडण्यासाठी व साठवण करण्यासाठी वन विभागाची कुठल्याही प्रकाराची परवानगी नसताना अनिल देशमुख यांच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये आदिवासी मजुरांकडून कवडीमोलाने ही दुर्मिळ लाकडे गोळा केली जात होती. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत हा गोरखधंदा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. अनिल देशमुखांच्या फार्म हाऊसवर वन विभागाचा छापा अघोरी कृत्य करण्यासाठी देखील वापर — वन विभागाने छापेमारीत फार्महाऊसमधून पांढरीच्या काड्या, मशीन लाखोंचे साहित्य जप्त केले आहे. अंधश्रध्देकरिता या लाकडाचा वापर केला जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या पांढरीच्या काड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. या काड्यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी वापरतात. तर याचा सर्वांत जास्त उपयोग अघोरी कृत्य करण्यासाठी देखील वापर केला जातो. याशिवाय काळी जादूच्या हवणासाठी या पांढरीच्या काड्यांचा वापर केला जातो. जप्त केलेला मुद्देमाल आसनगाव हद्दीत असलेल्या वन विभागाच्या डेपोत ठेवण्यात आला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.