बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली, दि.०७ – बांग्लादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एच. ए. अब्दुल मोमेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अब्दुल मोमेन यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नेमणूक झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी पहिल्या परराष्ट्र भेटीसाठी भारताची निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
हेही वाचा :- पंतप्रधान उद्या पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार
द्विपक्षीय संबंधांच्या अलीकडील घडामोडींवर पंतप्रधान डॉ. अब्दुल मोमेन यांनी पंतप्रधानांना अवगत केले. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारत-बांग्लादेश संबंध ऊर्ध्व दिशेने जात आहेत. बांग्लादेशाचे पंतप्रधान शेख हसीना यांच्या नव्याने चालू झालेल्या कार्यकाळात अति वेगाने काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची त्यांनी पुष्टी केली.