कल्याण डोंबिवलीसाठी शासनाने तातडीने क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करावी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याण डोंबिवलीचे आयुक्त गोविंद बोडके यानी कल्याण डोंबिवलीतील २८२ इमारतींचे वीज व पाणी तोडण्याचे आदेश ऐन पावसाळयाच्या तोडावर दिले असून यामुळे नागरिकांमध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे, डोंबिवलीतील बहुसंख्य इमारती या पागडी पध्दतीने भाडे तत्वावर देण्यात आल्या असून या इमारतींची देखबाल दुरुस्ती पण करण्यात येत नाही, यामुळे या इमारती आता धोकादायक झाल्या असून कित्येक इमारती अतिधोकादायक झाल्या आहेत हा प्रश्न सेाडवण्यासाठी राज्य शासनाने ठाण्या प्रमाणे कल्याण डोंबिवलीसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना तातडीने जाहीर करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने जर अशी कारवाई केली तर नागरिकांनी रहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात एका अधिकार्याने सांगितले. की कल्याण डोंबिवली महापालिकेत अवघे एकच संक्रमण  शिबिर डोंबिवली पश्चिमेला असून तेथे केवळ १० -१५ लोकांची निवासाची सोय होऊ शकते राजकीय नेते,नगरसेवकही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. जर इमारत दुदैवाने कोसळली. तर अशा नागरिंकंाची तात्पुरती सोय करता येईल पण कायम स्वरुपी सोय करणे प्रशासनाला शक्य होणार नाही.

एखादी अति धोकादायक इमारत कोसळली तर त्याचा परिणाम आजू बाजूच्या इमारतीवर पण होण्याची भिती असते आणि इतक्या लोकांची सोय करणे प्रशासनाला कठीण होणार आहे त्या अधिकार्याने संागीतले की ज्या इमारती अति व  धोकादायक आहेत त्या बहुतेक पागडी पध्दतीच्या असून भाडेकरु व इमारत मालक यांच्यात  वाद आहेत यामुळे या इमारतींची देखबाल दुरुस्ती पण गेल्या १५-२० वर्षात झाली नाही. यामुळे या इमारतीची दुरावस्था झाली आहे यासाठी नागरिकांनी तातडीने इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करुन घ्यावे ज्या इमारती दुरुस्त करता येतील त्या दुरुस्त कराव्यात व ज्या इमारती दुरुस्तीच्या बाहेर गेल्या असतील त्या रिकाम्या कराव्यात इमारत मालक व भाडेकरु यांनी  या इमारतींची पुर्नबांधणी करण्याचा प्लान द्यावा त्याना तातंडीने परवानगी देण्यात येईल असेही त्या अधिकार्याने सांगीतले.दुदैवाने इमारत कोसळली तर प्रशासनाने पर्यायी सोय म्हणून पालिकेच्या अनेक जागा रिकाम्या असून तेथे त्यांची तात्पुरती सोय करण्यात येईल प्रत्येक प्रभागात अशा जागा असल्याचे त्या अधिकार्याने सांगीतले. ”कल्याण डोंबिवलीचा अति  व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून अशा इमारती दुरुस्त करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे राज्य शासनाने ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीसाठी क्लस्टर येाजना तातडीने जाहीर करण्याची गरज असून डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी  प्रयत्न करावेत -दिपेश म्हात्रे,सभापती ,स्थायी समिती ,कल्याण डोंबिवली महापालिका…

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email