डोंबिवलीत प्रथमच कर्णबधीर मुलांची फुटबॉल स्पर्धा …

ओमकार कर्णबधीर विकास संस्था, डोंबिवली आणि युवक कॉंग्रेस डोंबिवली विधानसभा तथा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अमित म्हात्रे  यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवलीत प्रथमच कर्णबधीर मुलांची फुटबॉल स्पर्धा शनिवार २५ तारखेला सकाळी ८ वाजता डोंबिवली जिमखाना येथील म्हैसकर स्पोर्ट्स ग्राउंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे अमित म्हात्रे यांनी कल्याण – डोंबिवलीत प्रथमच अश्या प्रकारची स्पर्धा पार पडणार असून मुंबई आणि उपनगरातील कर्णबधीर मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या मुलाच्या कला-गुणांना वाव मिळावा हा त्यामागचा उद्देश आल्याचे सांगितले. या स्पर्धेत एकूण ८ संघांची सहभागी झाले असून कोल्हापूर आणि औरंगाबाद येथून दोन संघांची नोंद झाली आहे.स्पर्धेतील विजेत्या संघास १२ हजार रुपये रोख रक्कम ,ट्रॉफी आणि उपविजेत्या संघास ८ हजार रोख रक्कम ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email