प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त फळेवाटप.

उरण दि.१० – उरण तालुका भारिप वंचित बहुजन आघाडीचे बहुजन हृदयसम्राट एडवोकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर  यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे यांच्या आदेशानुसार व रायगड जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांच्या सूचनेनुसार स्वाभिमानी सप्ताह निमित्त उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

हेही वाचा :- सि.एच.ए. बांधवानी जमविला सि. एच.ए. बंधूसाठी दोन लाखांचा मदत निधी.

हा कार्यक्रम भारीप तालुका अध्यक्ष रामनाथ झीने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.  कार्यक्रमाला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक  डॉक्टर मनोज भद्रे, भारिप तालुका युवा अध्यक्ष भूपेश पाटील, रुपेश म्हात्रे-उरण विधानसभा अध्यक्ष, तुकाराम खंडागले तालुका संघटक, दिनेश राठोड, वामन राठोड तालुका सल्लागार, अविनाश मस्के, मुजब्बील तुंगेकर, राजन गरुड, उत्तम कांबळे-उपाध्यक्ष उरण तालुका, पत्रकार संघटनेच्या अध्यक्षा रुचिता मलबारी, अरुण मस्के आदी भारिप,बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email