मुंबई शहर आणि उपनगरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे

मुंबई दि.०८ :- मुंबई शहर आणि उपनगरात पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज,
कांजुरमार्ग पश्चिमेकडील एल. बी. एस मार्ग, सांताक्रुझ पश्चिमेकडील जुहू तारा रोड, चेंबूरमधील माहुल रोड आणि अंधेरी पश्चिमेकडील आंबोली या ठिकाणांचा समावेश आहे.

पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी – ‘सामना’ अग्रलेखातील ‘रोखठोक’

महापालिकेच्या २०२२-२०२३ आणि २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पांमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांसाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यांच्या बांधकामाची जबाबदारी नगर अभियंता विभागाकडे देण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत यातील एकही केंद्र कार्यान्वित झालेले नाही.

कोपर रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल सुरू

कांदिवलीतील केंद्र २०२३च्या अखेरीस सुरू होईल. भांडुपच्या जवळ असणारे केंद्र दोन वर्षांत पूर्ण होणाार आहे. त्याचे पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. तर नाल्याचा काही भागमध्ये येत असल्यामुळे सांताक्रुझचा केंद्राचे काम अडकून पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.