सीमा भागातील गावांमधील संस्था, संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय निधीतून आर्थिक मदत

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय करणार*

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२५ :- महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्यात येणार आहे. सीमा प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे २०२३-२४ करिता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.