वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर्फे अंतिम स्थगिती

 

 

पुणे बारामती सोलापूर सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे 4000 वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यां व अन्य विषयाबाबत आज गुरुवार दिनांक 9 जून रोजी मंत्रालयात. ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ )संघटनेची मिटिंग झाली. पश्चिम महाराष्ट्राती बदल्यांना त्यांनी आज अंतिम स्थगिती दिली.

तसेच या कष्टकरी कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सूचित केले.

पैश्याची मागणी वेतनात कपात या समस्यां सोडवण्यासाठी संघटना प्रतिनिधी व प्रशासनाने यावर एकत्र बसून एक महिन्यात यावर उपाय योजना करावी.

कंत्राटदार विरहित सेवा घेण्याबाबत संघटनेच्या सल्याने कंपनीचे पैसे वाचत आहेत यातून कामगारांना जॉब सिक्युरिटी मिळेल व त्यांचे पगार डायरेक्ट कामगारांच्या बँक खात्यात जमा होती.

संघटनेच्या वतीने मंत्री महोदय व सुप्रिया ताईंचे आभार मानले.

आजच्या मिटिंग साठी अण्णाजी देसाई, निलेश खरात, उमेश आनेराव, राहुल बोडके, सागर पवार संतोष अंबाड, राजू आव्हाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.