एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला विंचवाचा चावा
मुंबई दि.०६ :- नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बारसू रिफायनरीविरोधात उपनगरीय रेल्वे रेल्वे स्थानकांवर फलक, भित्तीपत्रकांद्वारे निषेध
नागपूर ते मुंबई दरम्यानच्या एआय ६३० या विमानात २३ एप्रिल या दिवशी विमान उड्डाण घेत असताना ही घटना घडली. विंचवाने डंख मारल्यानंतर महिलेने याची माहिती विमानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
‘महारेल’तर्फे तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण पुणे-गोव्याच्या दिशेचा प्रवास अधिक वेगवान
मुंबई विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घडलेल्या या प्रकाराबद्दल एअर इंडिया व्यवस्थापनाने एका निवेदनाद्वारे खेद व्यक्त केला आहे.